दरवाढीच्या ‘इंधना’मुळे महागाई घेणार पेट

पालेभाज्या, फळभाज्या, दूध, वाहतूक महागणार

ठाणे: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी वाढत असतानाच मागील आठवड्याभरात सीएनजी आणि घरगुती दरात देखिल तब्बल १२ रुपयांची वाढ झाल्याने महागाईचा आगडोंब उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने मागील आठवड्यात वॉट कर १० टक्क्याने कमी के ला होता, त्यामुळे ६७ रुपये दराचा सीएनजी ६० रुपयांवर आला होता. त्याबाबत वाहन चालकांनी आणि घरगुती गॅसचा वापर करणाऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र हा आनंद ग्राहकांना फक्त एक दिवस घेता आला. दुसऱ्याच दिवशी कें द्र सरकारने सीएनजीच्या
दरात सहा रुपये वाढ के ली. त्यानंतर मागील आठवड्यात सहा असे तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. आत्ता सीएनजीचा दर प्रतिकिलो ७२ रुपये इतका झाला आहे तर पेट्रोलच्या दरात देखिल दर दिवशी वाढ होत आहे.

आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १२१ रुपये तर डिझेल १०१ रुपयांवर पोहचले आहे. या दर वाढीमुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. प्रवासी वाहतूक देखील वाढण्याची शक्यता असतानाच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वाहतूक संघटनेने देखील २५ ते ४० टक्के दरवाढ करण्याची मागणी के ली. भाजीपाला, फळभाज्या, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखिल वाढत असून त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढण्याची
भीती व्यक्त के ली जात आहे.