ठ ा णे : ठ ा णे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश
पालकमंत्री एकनाथ शिं दे व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्यानंतर ठाणे स्शन ज टे वळील सहा घरे आणि पाच दकाने ु व मंगला हायस्कूल जवळील घरे रिक्त करून त्यावर निष्कासानाची कारवाई करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्टसिटी अंतर्गत कोपरी परिसरात सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्प कामामध् काही न ये िवासी घरे व दकान यामुळे कामास विलंब होत आहे. या प्रकल्पात होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकाचे तातडीने पुनव ं र्सन करुन हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पाहणी दौऱ्यावेळी दिले होते. त्यानुसार सर्व बाधित बांधकामे निष्कासित करून नागरिकांचे पुनवर्सन करण्यात आले आहे.
दरम्यान ठाणे महापालिके च्यावतीने शहरातील अनधिकृ त बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृ त बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईच्या अंतर्गत दिवा प्रभाग समिती येथील मोहसीन खान,फडके पाडा तलावामागे, खार्डी तळ मजल्याचे अंदाजे २८०० चौ फू ट बाधकाम जेसीबीच् ं या साहाय्याने व कामगाराच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच आतिफ खान यांचे शिबली नगर, शीळ येथील तळ व्याप्त पहिल्या मजल्यावरील अंदाजे ३० × १५ चौ.फू ट बाधकाम ग ं स कटरच् ॅ या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा येथील खार जमीनीवरील अनधिकृ त चाळीचे बांधकाम तोडण्यात आले.
कोपरी प्रभाग समितीमधील कारवाई उप आयुक्त मनिष जोशी व उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी तर दिवा प्रभाग समितीमधील कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.