आली समीप लग्नघटीका; आलिया आणि रणबीरची लगीनघाई सुरू

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. यांच्या विवाह सोहळ्याच्या आधीच्या समारंभाला सुरूवात झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती तसेच त्यांचे मित्र-मैत्रिणी लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

अयाननं ब्रम्हास्त्रमधील गाण्याची झलक शेअर केली आहे. अयाननं हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ आलिया आणि रणबीरसाठी खास… हे दोघे लवकर नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. हे दोघे माझ्या आयुष्यातील जवळचे व्यक्ती आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ‘रिपोर्टनुसार, आर. के. स्टुडिओमध्ये रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण दोहर जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे.

तसेच आलिया आणि रणबीर यांचे जवळचे मित्र-मैत्रीणी देखील या रॉयल विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान हे आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूरचे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेहंदी, साखरपूडा आणि हळद हे कार्यक्रम आज आरके हाऊसमध्ये पार पडणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोंमध्ये नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर या  कारमधून आरके हाऊसकडे जाताना दिसत आहेत.

 

 

 

 

 

पूजा भट आणि महेश भट यांनी मेहंदी सोहळ्याला लावली हजेरी 

 

 

 

 

 

आलिया आणि रणबीर यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्टिकर लावण्यात येत आहे, असं दिसत आहे.  सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले वाउन्सर हे स्टिकर लावताना दिसत आहेत.