ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले.
ही कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये करण् ं यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. या कारवाईच्या अंतर्गत दिवा प्रभाग समिती येथील सफिअल्ल्हा चौधरी यांचे तळअधिक पहिल्या मजल्याचे अंदाजे २५०० चौ फूट बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने व कामगाराच्या मदतीने निष्कासित करण्यात आले.
सदर बांधकामावर एमआरटीपी दाखल करण्यात आली आहे. अब्ल गणी शेख यांचे दु शिबळी नगर येथील तळअधिक व्याप्त दुसऱ्या मजल्यावरील अं दाजे २७०० चौ.फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने के ली.