कल्याण : महिलांना उद्योजिका बनवण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे होत आहे. मंगळवारी १२ एप्रिल रोजी शिवसेना युवासेना ठाणे
ग्रामिण यांच्या वतीने गणपती मंदिर हॉल येथे महिलांसाठी व्यवसाय उद्योजक मेळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख वसंत लोणे, माजी नगरसेवक सुनील वायले, ग्रामीण जिल्हा सचिव अॅ ड. अल्पेश
भोईर, अॅ ड. जयेश वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामिण भागातील महिलांना हक्काचा उद्योग व्यवसाय सुरु करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी इच्छा असूनही उद्योग व्यवसाय काय करावा हेच माहित नसतं तर कधी उमेद असूनही भांडवलाची समस्या महिलांच्या कतृत्वाला मर्यादा आणते. याच प्रश्नांची उकल करत महिलांना व्यवसायाच्या संधी आणि साधनं उपलब्ध करुन देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. असल्याचे शिवसेना ठाणे ग्रामिण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
या नियोजित मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध व्यवसाय देणाऱ्या जवळपास ६० संस्था तसेच वित्तसंस्था सहभागी होणार आहेत. राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास व्हायचा असेल तर महिला सबलीकरण व सक्षमिकरण आवश्यक असल्याने ठाणे ग्रामिण जिल्ह्यातील अधिकाधीक महिला बचत गटांनी आणि महिलांनी या उद्योजिका मेळाव्याला भेट द्यावी असं आवाहन प्रकाश पाटील यांनी के ले असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातही असेच मेळावे आयोजित के ले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.