जिल्हा परिषदेची शाळा भरते मुख्याध्यापकांविना

विद्यार्थीसंख्या १९४ आणि शिक्षक अवघे तीनच

अंबरनाथ : गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांविना भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत १९४ विद्यार्थ्यांना अवघे तीनच शिक्षक शिकवण्याचे काम करतात असा प्रकार अं बरनाथ तालुक्यातील कासगाव शाळेत पहावयाला मिळत आह.

दर्जेदार शिक्षणामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. परंतु अं बरनाथ तालुक्यातील कासगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची खंत पालक वर्गातून होत आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने पाठपुरावा करूनही या शाळेला नियमानुसार
शिक्षक मिळालेले नसून दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांचे पदही रिक्तच आहे. शाळेला पुरेसे शिक्षक मिळावेत यासाठी आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ पालकांवर आली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील कासगाव येथे असलेल्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या १९४ आहे. शाळेत वर्गखोल्या, पाणी, शौचालय आदी इतर सोयीसुविधा आहेत. मात्र पुरेश्या शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी के ला आहे.शाळेत अवघे तीन शिक्षक आहेत. विद्यार्थी पटसंख्या विचारात घेता शाळेत किमान सात शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र तीन शिक्षकांनाच हे काम पहावे लागते. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून शाळेचे मुख्याध्यापक पदही रिक्त आहे. त्यामुळे या रिक्त पदांचा भारही या तीन शिक्षकांवर येऊन पडत असतो. अशा परिस्थितीत काम करताना उपलब्ध शिक्षकांवर ताण येत असून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात अं बरनाथ तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आर. डी. जतकर यांची वारंवार भेट घेऊन निवेदने सादर करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात तरी शिक्षक उपलब्ध व्हावेत, अशीही मागणी करण्यात आली. मात्र यावर ठोस उपायोजना झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शाळे ला पुरेसे शिक्षक व मुख्याध्यापक उपलब्ध न करून दिल्यास गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आं द ो ल न क र ण् या च ा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी असलेली शिक्षकसंख्या वाढवण्याबाबतचे निवेदन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य
राकेश टेंबेअं बरनाथतालुका गटशिक्षण अधिकारी आर. डी. जतकर यांना दिले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष राऊत, उपाध्यक्ष सुजाता टेंबे, कासगावच्या सरपंच हर्षदा राऊत आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षक भरती प्रक्रियेत शाळेला शिक्षक मिळू शकतील, त्यामुळे दिलासा मिळेल अशी माहिती गटशिक्षणाधिकारी आर.डी. जतकर यांनी दिली.