डिलीव्हरी बॉयची होणार चारित्र्य पडताळणी

ठाणे : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू किंवा अन्नपदार्थ ग्राहकांच्या घरी पोहोचवणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगारी वर्तन घडत असल्याचे निदरनास आल् ्श याने
स्वीगी, झोमॅटो अशा कं पन्यांच्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून ओळखपत्र देण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील नौपाडा भागात स्वीगी बॉय बनून एका महिलेच्या मुलाच्या गळ्यावर चाकू ठे वून, चाकूचा धाक दाखवत जवळपास १० लाखांची लूट के ली
होती. या गुन्ह्यात पोलिसांनी जवळपास ६० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आणि त्यानंतर गुन्गारांना हे जैरबंद करण्यात ठाणे पोलिसांना यश आले. या गुन्ह्यात एकूण तीन
आरोपी असून त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. मुख्य आरोपी व फिर्यादी महिला यांची एकमेकांशी ओळख होती आणि याचा फायदा आरोपींनी घेतला. झटपट पैसा कमवायचा या कृतीतून हा गुन्हा घडला, असे पोलीस सांगत आहेत.

अशा गुन्ह्यातून ऑनलाईन डिलिव्हरी बॉयची माहिती कशी मिळवायची, गुन्हेगारांपर्यंत कसं पोचायचं हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची गंभीरता लक्षात घेत महत्वाची नियमावली ठाणे पोलिसांनी बनवली आहे. आपण ऑनलाईन ऑर्डर देऊन काही तरी वस्तू मागवतो, परंतु आता स्वीगी- झोमॅटोसारख्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार आहे. त्यांना एक स्पेशल आयकार्ड देण्याचा निर्णय ठाणे पोलिसांकडून घेण्यात आला आहे. सुरक्षारक्षकांनी देखील अशा सेवा देणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढून व फोन नंबरची शहानिशा करूनच इमारतीमध्ये प्रवेश द्यावा, असा वटहुकू मच ठाणे पोलिसांनी काढला आहे.

या बाबत अशा सेवा देणाऱ्या संस्था किं वा कं पनी प्रशासनाची संयुक्त बैठक पोलीस घेणार आहेत. या बाबतच्या सूचना प्रत्येक सोसायटीच्या कमिटीला करणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी सांगितले.