सावरकर नगरला नवीन जलकुंभ

१५ जलकुंभ ३५ वर्षे जुने

ठाणे : सावरकर नगर येथील जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने त्याच्या बाजूलाच नवीन जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने केला आहे. जुन्या जलकुंभाची पाण्याची साठवणूक क्षमता दोन एमएलडी होती. तर नव्या जलकुं भाची क्षमता तीन एमएलडी एवढी असणार आहे, अशी माहिती पालिके च्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

सावरकर नगर भागात असलेला ठाणे महापालिके च्या जलकुंभाचा स्ब लॅ कोसळल्याची घटना बुधवारी घडली होती. त्यांनतर तातडीने या जलकुं भाच्या दरुस्ु तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सावरकर नगर भागात हा जलकुं भ 1985 साली बांधण्यात होता. या जलकुंभाच्या माध्यमातून किसन नगर, सावरकर नगर, इदिरानगर आदींसह सात भागांना पाणीपुरवठा के ला जातो. मागील तीन ते चार वर्षापासून या जलकुं भाच्या वरील स्लॅब हा कमकु वत झाला होता. यासंदर्भात येथील कामगारांनी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्याकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या जलकुं भ मधुन होणारा होणारा पाणीपुरवठा तपासण्यासाठी असलेले इंडिके टर बंद होते, त्यामुळे त्यामुळे पाणी किती येते किती जाते हे समजू शकत नव्हते त्यामुळे पाण्याची पातळी तपासण्यासाठी कामगार
गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. सावकर नगर येथील जलकुं भ हा जवळपास ३७ वर्ष जुना असून हा जलकुं भ जीवन प्राधिकरणाच्या काळात बांधण्यात आला होता. सावरकर नगर प्रमाणेच शहरात जवळपास १५ जलकुं भ जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात आले असल्याने हे सर्व जलकुं भ हे ३५ वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. मात्र बहुतांश जलकुं भाची दरुु स्ती करण्यात आली आहे. जे दरुस्त करण् ु याचे राहिले असतील त्यांचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जलकुं भाच्या दरुु स्तीचे काम सुरु करण्यात आले असले तरी या कामाचा पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठ्यासाठी बायपास सुविधा निर्माण करण्यात आली असल्याने जलवाहिनीमधून पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील सर्व जलकुंभावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.