ठाणे : गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून ठाणे महापालिकेने यासाठी पार्किंगची दरनिश्चिती सुद्धा केली आहे. दचा ु कीसाठी पहिल्या
दोन तासांसाठी १० रुपये तर चार चाकी वाहनांसाठी २५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी गावदेवी येथे २७ कोटी रुपये खर्च करून भूमिगत पार्किंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम करण्यात आले असून येथे १३० चार चाकी आणि १२० दचा ु की वाहने पार्क करता येणार आहेत. पार्किंग संदर्भातील निविदा प्रक्रिया नुकतीच प्रसिध्द झाली असून येत्या २४ एप्रिलपर्यंत ती अंतिम करण्यात येणार आहे. यामध्ये ठेकेदार पालिकेला उत्पन्नातील किती हिस्सा देणार त्यावर ही निविदा मंजुर के ली जाणार आहे. शिवाय ठेके दाराने येथील निगा देखभालीचा खर्च देखील करायचा असून वीजेचा व इतर खर्चही ठेके दारालाच करायचा आहे. त्यामुळे आता या निविदेला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकीकडे भूमिगत पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन दिली जात असतांना दसरी ु कडे मैदानही पूर्वीप्रमाणे क्रिडा प्रेमींसाठी खुले केले जाणार आहे. त्यानुसार येथे मातीचा भराव टाकणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
असे असतील पार्किंगचे दर
दचा ु कीसाठी पहिल्या दोन तासांसाठी १० रुपये तर पुढील दोन ते चार तासासांठी पाच रुपये वाढीव शुल्क असणार आहे. तर त्यापुढील तासासांठी देखील पाच रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. चारचाकी वाहनांसाठी पहिल्या दोन तासांसाठी २५ रुपये आणि त्यापुढील दोन ते चार तासांसाठी अतिरिक्त 5 रुपये आणि चार तासापुढे अतिरिक्त १० रुपये आकारले जाणार आहेत.ओव्हर नाईट शुल्क एक हजार रुपये आकारले जाणार आहे.