डिझेल चोरी करताना भडका उडून झोपड्या जळून खाक

ठाणे : मुंबईच्या बीपीसीएल रिफायनरी ते मनमाड व मनमाड ते दिल्लीकडे जाणारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची सुमारे १८ से.मी.ची भूमिगत डिझेल वाहिनी आज सकाळी शीळमहापे रोडवर महापे औद्योगिक व स ा ह त ी त ी ल अ ड व ल ी गावानजीक फु टल्याने एकच गोंधळ उडाला. डिझेल चोरी करताना ही वाहिनी फुटल्याने यात अनेक झोपड्या व सुमारे १५ झाडे जळून खाक झाली आहेत.

महापे येथील शिळफाटा रस्त्यावर अडवली भुतावळी गावानजीक जंगलात ही आग लागली. या ठिकाणी भूमिगत डिझेल वाहिनी फोडून डिझेलचोरी सुरु होती. त्या तू न ग ळ त ी झ ा ले ल्या डिझे ल वर ठिणगी ही आग लागली. सध्या उन्हाळा असल्याने परिस रा त ी ल झ ा डे वाळलेली असल्याने झाडांनीही पेट घेतला. तर जवळच असलेल्या काही झोपड्याही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. तसेच या परिसरात वखार, गोडाऊनमधील सामान वेळीच हलवल्याने मोठे नुकसान टळले. आग विझवण्यासाठी सिडको, कोपरखैरणे, ऐरोली ठाणे रबाळे व पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. आग डिझेलमुळे लागल्याने पाणी मारूनही विझत नव्हती. अखेर फोम मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यावेळी ३८ अधिकारी – कर्मचारी यांच्या टीमने पाच तासांनी आग विझवली. घटनास्थळी बेकायदा झोपड्या आणि गाळे गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत. या बेकायदा झोपड्या, गोडाऊन आणि गाळ्यांमुळे आग विझवण्यास अडथळा निर्माण झाला. दरम्यान, डिझेलच्या किं मती गगनाला भिडल्याने चोरटे आता वाहिन्या फोडून डिझेल चोरण्याचा जीवघेणा प्रकार करत असल्याचे या निमित्ताने समोर आले.