प्रशासकीय राजवट लागताच उल्हासनगर पालिकेत शुकशुकाट

उल्हासनगर : लोकप्रतिनिधींचा कालावधी संपल्याने आणि त्यात निवडणुका लांबणीवर पडल्याने उल्हासनगर महानगरपालिका विसर्जित करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवट लागू झाल्याने गजबजणाऱ्या पालिके त शुकशुकाट पसरला आहे. पदाधिकाऱ्यांचे बोर्डही काढून टाकण्यात आले आहेत.

1996 स ा ल ी महानगरपालिके ची स्थापना झाली होती. त्यास 26 वर्षे झाली आहेत. लोकप्रिनिधींचा कालावधी संपण्यापूर्वीच पालिके च्या निवडणुका जाहीर होत होत्या. मात्र यावेळी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे 4 एप्रिल रोजी लोकप्रतिनिधींचा कालावधी संपताच पालिका विसर्जित करण्यात आली आहे. महापौर लिलाबाई आशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे या मुख्य पदाधिकाऱ्यांसह गटनेत्यांचे बोर्ड काढण्यात आल्याने पालिके त शुकशुकाट पसरला आहे.

महानगरपालिके ची स्थापना झाल्यापासून राजेंद्रसिंह भुल्लर, धनंजय बोडारे, रमेश चव्हाण, जमनादास पुरस्वानी, राजू जग्यासी, जीवन इदनानी, भारत गंगोत्री, मीना सोंडे, मीना आयलानी यांच्या सोबत दाम्पत्य किं वा एकाच कु टुंबातील सदस्य असलेले राजेंद्र चौधरी, राजेश्री चौधरी, दिलीप गायकवाड, ज्योती गायकवाड, सुरेश जाधव, जोत्सना जाधव, अं कु श म्हस्के, अंजना म्हस्के यांचा समावेश असून हे सर्व आता माजी नगरसेवक झाले आहेत.