खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे : सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर आंतर-जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद
स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ३ एप्रिल रोजी पार पडला.
स्पर्धेचे शानदार उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. ठाणे महापालिकेच्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे भरवण्यात आलेल्या या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातून खेळाडूंचा आणि जिल्ह्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील पुरुष संघांनी आणि १६ महिला संघांनी असे एकूण मिळून ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अं तर्गत असून ही तीन दिवस चालणार आहे. हा कार्यक्रम खासदार व पद्मश्री कु मार के तकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आणि उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी मिनल पालांडे याही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध होत्या. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे डेप्युटी प्रेसिडेंट प्रदीप गंधे, सेक्रेटरी श्री. एस.ए. शेट्टी आणि तसेच आशिष बाजपेयी, कुलीन माणेक, महशे वक्राडकर व मंगेश काशिकर हे पदाधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेला प्रायोजकत्व देणारे विनय अगरवाल तसेच आर्कि टेक्ट भूषण जोशी हे देखील पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेत श्रीकांत शिंदे यांनी मार्चपास करत विविध जिल्ह्यातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या व ठाणे जिल्ह्यातील सर्व खेळाडु, प्रशिक्षक आणि कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन ठाणे जिल्ह्यात क्रीडा विकास करण्याचे आश्वासन श्रीकांत शिंदे यांनी दिले. ठाण्यात “स्पोर्ट एक्सले ्स न्स सेन्टर” उभारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आपण करणार असल्याचे नमूद केले. या प्रसंगी ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीकांत भागवत, विनोद धारप, मिलिंद आपटे तसेच अध्यक्ष श्रीकांत वाड आणि सचिव मयूर घाटणेकर हे देखील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांनी केले.
यात औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये रंगलेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात जळगावने बाजी मारली. औरंगाबादच्या दिग्विजय सिंग राजपूतने जळगावच्या दीपेश पाटील याचा २१-१९ व २१-१५ या सेटमध्ये पराभव केला. परंतु औरंगाबादच्या साके त औटी याला जळगावच्या शुभम पाटीलकडून १६-२१, ५-२१ अशा सेटमध्ये हार स्वीकारावी लागली. पुरुष दहुेरीच्या सामन्यात जळगावच्या शुभम पाटील व दीपेश पाटील यांनी औरंगाबादच्या अर्णव रश्मी शिरीष व निनाद कु लकर्णीचा ८-२१,१२-
२१ असा पराभव के ला. पुरुष एके रीच्या तिसऱ्या सामन्यात औरंगाबादच्या सौरभ बर्वेने जळगावच्या उमेर देशपांडे याला २१-१७ व २१-१९ असं नमवून २-२ ने बरोबरी साधली परंतु पुरुष दहुेरीच्या दसु ऱ्या सामन्यात जळगावच्या गोपाल पाटील आणि उमेर देशपांडे यांनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करत औरंगाबादच्या सदानंद महाजन व सुधांशु शिंदे या जोडीचा २१-१५, २१-१० असा पराभव करत ३-२ने संघाचा विजय सुनिश्चित केला. रायगड आणि पालघरच्या पुरुष एकरीच्या पहिल्या लढतीत
रायगडच्या सिद्धार्थ दासने पालघरच्या नितेश कु मारचा २१-१३,२१-१९ असा पराभव के ला. दसु ऱ्या लढतीत रायगडच्या पियुष अगरवालने पालघरच्या देव रुपारेलीयाचा २१-१६,२१-१४ असा पराभव के ला परंतु पुरुष एकरीच्या तिसऱ्या व अतिशय चुरशीच्या सामन्यात पालघरच्या मल्हार घडीने रायगडच्या दिग्विजय गोहिलचा २१-१२, ११-२१, २४-२१ असा पराभव के ला. तर पुरुष दहुेरीच्या सामन्यात पालघरच्या अर्जुन सुरेश व मोहित कनानी यांनी तुषार मुने व योगेश पाटीलचा २५-२३, २१-१५ असा पराभव के ला आणि दसु ऱ्या निर्णायक सामन्यात पालघरच्या आर्यन मकवाना आणि नितेश कु मार यांनी रायगडच्या निशांत गलांडे आणि पियुश अगरवाल चा १९-२१,
२१-१५, २१-१६ असा पराभव करत ३-२ ने संघाला विजय प्राप्त करून दिला.
महिलांच्या सांघिक सामन्यांत औरंगाबाद आणि ठाणे यामध्ये ठाण्याच्या संघाने बाजी मारली. ठाण्याच्या आर्या कोरगावकरने औरंगाबादच्या संस्कृती सातारकरचा २१-८, २१-११ ने पराभव के ला तर दहुेरीत अक्षया वारंग आणि हारिका व्ही. यांनी औरंगाबादच्या २१-८,२१-५ असा पराभव करीत संघाला विजेतेपद प्राप्त करून दिले. पुण्याच्या महिला संघाने सांगली च्या संघाला हरवून पुढील फे रीत स्थान पक्के के ले. एके रीच्या सामन्यात पुण्याच्या ऋचा सावंत हिने सांगलीच्या सिया बंगचा २१-१६,२१-७ असा पराभव के ला. तर दहुेरीच्या सामन्यात पुण्याच्या रिया कुंजीर आणि साद धर्माधिकारी यांनी सांगलीच्या श्रुती शंकरगौडा आणि सिया बंगचा २१-११,२१-११ असा पराभव करून संघाचा विजय निश्चित के ला. सदर राज्य स्पर्धेच्या उपांत्य फे रीत पुरुष गटात ठाणे आणि नागपूर व पुणे आणि ग्रेटर मुंबई यामध्ये चुरशीचे सामने रंगणार आहेत.
तसेच महिला गटात पुणे आणि ठाणे जिल्ह्यात सामना रंगणार असून दसु रा सामना नागपूर आणि ग्रेटर मुंबई यांमध्येहोणार आहे.