१० वर्षांत पावणे तीन लाख झाडांची भर
माजिवडे-मानपाडा भागात सर्वाधिक झाडे
हेरिटेज झाडांची संख्या ९००
ठाणे : मागील वृक्षगणनेच्या तुलनेत ठाण्यात यंदा दोन लाख ७७,१६४ नव्या झाडांची भर पडली असून एकूण सात लाख २२,४२६ एकूण झाडांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ५० वर्षाहून जास्त वयाची ९०० हेरिटेज झाडे आढळून आली आहेत. माजिवडे-मानपाडा विभागात सर्वाधिक तर कळवा- मुंब्र्यात सर्वात कमी वृक्ष आढळले आहेत.
दर पाच वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करणे बंधनकारक आहे. यापूर्वी २०१२ मध्ये सर्वेक्षण करण्य आले होते. २०१७ साली वृक्षगणना करण्यासाठी टेराकॉन या कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता. यासाठी ७० लाखांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली. मात्र २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने या कामाला लागला. त्यानंतर मात्र वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात होऊन १५ दिवसांपूर्वी सबं धिं त कं पनीने वृक्षगणनेची माहिती ठाणे महापालिकेला दिली आहे.
वृक्षगणनेमध्ये २७१ जातींची झाडे आढळली असून मागील सर्व्हेच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. शहरात एकाच जातीची झाडे मोठ्या प्रमाणात लावली गेली असल्याने झाडांच्या जाती कमी प्रमाणात आढळल्या आहेत. झाडांची संख्या मात्र वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृक्षगणनेत सर्वाधिक एक लाख ८३,४०९ झाडे ही एकट्या
माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात आढळली आहेत. याच प्रभाग प्रभाग समिती क्षेत्रात हेरिटेज झाडांची संख्या देखील अधिक आहे. सर्वात कमी झाडे कळवा आणि मुंब्रा या प्रभाग समिती क्षेत्रात आढळली आहेत. शहारत ३३ टक्क्यांपर्यंत ग्रीन कव्हरची आवश्यकता आहे. मात्र ठाण्यात जवळपास ५७ टक्के ग्रीन कव्हर असून आता यामध्ये आणखी जवळपास तीन लाख झाडांची भर पडली असल्याने हे कव्हर ५७ टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालकेचे क्षेत्र – १४३ किमी
आढळलेल्या झाडांच्या जाती – २७१
एकूण झाडांची नोंद -७,२२,४२६
वाढलेल्या झाडांची संख्या -२,७७,१६४
एकाच जातींच्या झाडांची संख्या – १,११,६३४
चांगल्या स्थितीत असलेल्या झाडांची संख्या – ७,१५,८७५
वृक्ष लागवडीबाबत ठाणे शहरात जनजागृती आणि मोहिमा राज्य,
कें द्र सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत होत असला तरी सरकारी
जमिनीवरच वृक्षांची संख्या कमी म्हणजे ३५ टक्के आढळून आली आहे
तर खासगी क्षेत्रात ६५ टक्के प्रमाण आढळून आले आहे.