ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. तीन नवीन रुग्णांची भर पडली आहे तर दोन जण रोगमुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत माजिवडे-
मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात दोन आणि वर्तकनगर प्रभाग समिती परिसरात एक असे तीन रूग्ण सापडले आहेत. उर्वरीत प्रभाग समिती भागात एकाही रुग्णाची
नोंद झाली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी दोन जण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एक लाख ८१,५३२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात केवळ एक आणि घरी १३ अशा १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३५५ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये तीन जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख २,९२८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत एक लाख ८३,६७३ जण बाधित सापडले आहेत.