ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं.प्रा.लि. यांच्यावतीने मानकोली एम.बी. आर येथे स्टेम कंपनीच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात येणार आहे.
परिणामी बुधवार 30 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते गुरुवार 31 मार्च 2022 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने ठाणे महानगरपालिकच्या स्वत:च्या योजनेतील उपलब्ध पाणीपुरवठा झोनिंग करुन बुधवार 30 मार्च 2022 सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत इंदिरानगर, श्रीनगर, रामनगर, लोकमान्यनगर, वागळे घोडबंदर रोड (1158), पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतूपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, इटरनिटी व मुंब्य्राच्या काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
शटडाऊनमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे ल, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.