ठाणे : सोन्याची बिस्किटे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून १७ लाखांची रोकड लुटल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पूर्व भागातील कोपरी परिसरात राहणारे व्यापारी सुरज डांगर यांना आरोपी अशोक आणि त्याच्या सहा साथीदारांनी कस्टम येथील सोन्याची बिस्किटे स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून त्यांना काल २४ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता मानकोली येथे घेऊन गेले. तेथे त्यांच्यासोबत असलेल्या भूषण सावंत, विश्वनाथ निंबाळकर आणि स्वामी यांना पोलीस असल्याचे भासवून प्लास्टिक काठ्याने मारहाण करून श्री. डांगर यांच्याकडे असलेली १७ लाख ५० हजारांची रोकड जबरदस्तीने लुटून नेली. याबाबत कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरी पोलीस करत आहेत.