ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. आज पाच नवीन रुग्णांची भर पडली आहे. अवघे दोन जण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने एकही रूग्ण व्हेंटिलेटरवर नसून कोणीही दगावलेला नाही.
महापालिका हद्दीतील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात तीन आणि वर्तकनगर प्रभाग समिती येथे दोन अशा पाच रुग्णांची भर पडली आहे. उर्वरित सात प्रभाग समिती परिसरात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४९८ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात तीन आणि घरी २० असे २३जण उपचार घेत आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७६१ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये पाच जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ९७,२९६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६४८जण बाधित मिळाले आहेत.