ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३,२९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी ३० लाख १८,४४७ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ६७,४४४ नागरिकांना तर ५९ लाख ९९,२२२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५१,७८१ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २९० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.