जलवाहतूकीसाठी चार जेट्टीची कामे लवकरच सुरु

खासदार राजन विचारे यांची मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी

ठाणे: वसई, ठाणे, मीरा-भाईंदर भिवंडी, कल्याण या महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात चार जेट्टीची कामे सुरू होणार
आहेत. याचा पाहणी दौरा आज खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी, पालघर जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित केला होता.

या पाहणी दौऱ्याला पालघर मतदार संघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय शर्मा, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर प्रियेश अग्रवाल, तसेच पालघर जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे उपमहापौर प्रवीण पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण जंगम, संदीप पाटील, बर्नाड डिमेलो, जॉर्जी व इतर नगरसेवक पदाधिकारी व पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाईंदर येथील जैसल पार्क जेट्टी येथून बोटीने भाईंदर-नायगाव यांना जोडणारा पश्चिम रेल्वे रुळ मार्गावरील ६० वर्षांपूर्वी बांधलेला व धोकादायक झालेला पुलाची पाहणी
केली. सदर पूल पाण्याच्या पातळीपासून कमी उंचीवर असल्याने जलवाहतुकीच्या मार्गासाठी अडथळा ठरत होता. या पुलावरून पालघर येथील पुंजू या गावासाठी पिणाऱ्या पाण्याची पाईपलाईन असल्याकारणाने नवीन पुलावर स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेकडून बारा कोटीची डिमांड मागितल्याने सदर पुलाचे काम जिल्हा परिषदेने रोखून ठेवलेले आहे. यासंदर्भात पालघर व ठाणे लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित व खासदार राजन विचारे हे रेल्वेने मागणी केलेले बारा कोटी माफ करून देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहेत. जेणेकरून धोकादायक झालेला पूल निष्कासित करून भविष्यात मोठ्या जलवाहतुकीसाठी मार्ग मोकळा होणार आहे.

खासदार राजन विचारे हे जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहेत. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यावेळचे तत्कालीन ठामपा आयुक्तसंजीवजी जयस्वाल यांनी ठाणे जिल्ह्याला लाभलेला खाडी किनारा लक्षात घेऊन जलवाहतूक सुरू करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय
मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे २८ जुलै २०१६ रोजी सादरीकरण करण्यात आले. ७ महानगरपालिकेला जोडणारा हा जलवाहतूक प्रकल्प ठाणे महानगरपालिकेने तयार
केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे नितीन गडकरी यांनी कौतुक केले होते. पहिल्या टप्प्यासाठी १०० टक्के व द्वितीय टप्प्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आणि ऑक्टोबर २०१८ केंद्रशासनाला सादर करून मंजुरी मिळवली. परंतु हे काम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागत होता.

पहिल्या टप्प्यातील जेट्टीचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत हाती घेण्यात आले असून त्यामधील वसई-ठाणे-कल्याण या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी राष्ट्रीय जलमार्ग क्र.५३ मध्ये जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरिता खालील १० ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात
येऊन त्यामध्ये वसई, मीरा-भाईंदर, घोडबंदर, नागलाबंदर, कोलशेत, काल्हेर, पारसिक, अंजुर दिवे, डोंबिवली, कल्याण हा प्रकल्प केंद्र शासनास सादर करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात खालील चार ठिकाणी जेट्टी

डोंबिवली जि.ठाणे येथे जेट्टी बांधकाम करणे. कोलशेत जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे. मीरा भाईंदर जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे. काल्र हे जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.

बांधण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल १०० कोटी मान्यता मिळाली असून त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे ५०-५० टक्के निधी उपलब्ध होणार असून याच नुकताच राज्य शासनाकडून या आर्थिक वर्षात तरतूद करून दिल्यामुळे जलवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जलवाहतुकीमुळे होणारा फायदा

ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध करुन दिल्यास वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसचे किनारपट्टीवरील नागरिकांना आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

वसई-भाईंदर रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या भाईंदर ते वसई रो-रो सेवेच्या कामाची पाहणी आज करण्यात आली. हे काम पूर्णत्वास येत आहे. त्यामध्ये भाईंदर जेटीचे १००टक्के काम पूर्ण झालेले आहे. वसईतील जेटीचे ६० टक्के काम पूर्ण झालेले आहे. खासदार राजन विचारे यांनी या दोन्ही जेटीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी असे वसई येथील जेटीचे काम 31 मेपर्यंत पूर्ण होऊन जूनपर्यंत रोरो सेवा सुरू करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या रो-रो सेवेमुळे भाईंदर व वसईकरांना गाडीने दोन ते अडीच तासाचा वळसा मारून जावे लागते, आता तो वेळ लागणार नाही बोटीतून आपले वाहने टाकून फक्त पंधरा मिनिटात हा प्रवास यांना मिळणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.