सक्रीय रुग्ण संख्या प्रथमच शंभरखाली
ठाणे : मानपाडा माजीवडा प्रभाग समिती वगळता आठ प्रभाग समिती भागात आज एकही रूग्ण सापडला नाही. शहरात फक्त सात नवीन रूग्ण सापडले आहेत. तर ११ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १०० च्या आत आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत माजीवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सात रूग्ण सापडले आहेत. तर इतर प्रभाग समिती भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. विविध रुग्णालयात आणि घरी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी अकरा जण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ३४४ रूग्ण रोग मुक्त झाले आहेत तर रुग्णालयात आठ आणि ८७ रुग्णांवर घरी असे ९५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६२९ नागरिकांची कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये अवघे ७ जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २३ लाख ८८ हजार ७६१ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ५६६ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.