ठाणे जिल्ह्यात सायंकाळी सातपर्यंत सुमारे १५ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ४६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख ४५ हजार ९३० डोसेस देण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४५ हजार ३२९ नागरिकांना तर ५८ लाख ५९ हजार २७० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४१ हजार ३३१ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २९४ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.