शहरात आज १६ नवीन रुग्ण

ठाणे – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून आज १६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८ जण कोरोना मुक्त झाले. एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

महापालिका हद्दीत सर्वाधिक प्रत्येकी चार रूग्ण माजीवडा मानपाडा आणि नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. वर्तकनगर आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात प्रत्येकी तीन रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येकी एक रुग्ण उथळसर आणि वागळे प्रभाग समिती भागात सापडले आहेत तर सर्वात कमी शून्य रुग्ण कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती येथे नोंदवले गेले आहेत.

विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी १८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार २४७ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १२२ जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत दोन हजार १२७ रूग्ण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७१६ नागरिकांची चाचणी केली होती. त्यामध्ये १६ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ८४ हजार १८० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ४९६ जण बाधित मिळाले आहेत.