मंजिरी देव, भागवत, ॲड.साळवी, पाठक, शांताराम शिंदे, डॉ. देसाई झाले ठाणे भूषण
ठाणे : ठाण्याच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींना “ठाणे भूषण”, ठाणे गौरव” व ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन आज गौरवण्यात आले. राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षेतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
चार युद्धाचे साक्षीदार असलेल्या शांताराम विश्राम शिंदे, कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. दिनकर देसाई, कृत्रिम तलावांच्या माध्यमातून हजारो लीटर पाण्याची निर्मिती करणारे आनंद भागवत, मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणारे अँड दिपक साळवी, डॉ. नरेंद्र पाठक यांना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा मानाचा “ठाणे भूषण” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर,सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेता अक्षरफ शानु पठाण, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन समिती सभापती विलास जोशी, कला क्रीडा व सांस्कृतिक सभापती प्रियांका पाटील, झोपडपट्टी सुधारणा समिती साधना जोशी, आरोग्य परीरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती निशा पाटील, लोकमान्यनगर – सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षा आशा डोंगरे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भुषण भोईर, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, नौपाडा – कोपरी प्रभाग समिती नम्रता फाटक, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उपआयुक्त मारूती खोडके आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ व्यक्तींना ‘ठाणे गौरव’पुरस्कार तर ११९ व्यक्तींना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर शैक्षणिक,कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांचा विशेष क्रीडा पुरस्कार, कोविड काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम केलेल्या डॉक्टरांचा देखील विशेष उल्लेखनीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देखील यावेळी पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यामध्ये गणेशोत्सव आरास स्पर्धा प्रथम क्रमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, द्वितीय क्रमांक जयभवानी मित्र मंडळ, तृतीय क्रमांक शिवगर्जना मित्र मंडळ, चतुर्थ क्रमांक श्रीरंग सहनिवास मंडळ, पाचवा क्रमांक नवतरुण मित्र मंडळ, सहावा क्रमांक जय भवानीसार्वजनिक उत्सव मंडळ, सातवा क्रमांक अमर मित्र मंडळ, आठवा क्रमांक शिवाई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर स्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर, द्वितीय क्रमांक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक चैतन्य मित्र मंडळ तसेच उत्कृष्ट मूर्तिकार प्रथम महादेव नंदिवकर, द्वितीय क्रमांक सुनील गोरे व तृतीय क्रमांक दिपक गोरे यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.