‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर येणार ‘झुंड’ चित्रपटाची टीम!

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल हे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे.
दर आठवड्याला या स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे पाहुणेही  मंचावर येतात. ह्या आठवड्यात ‘झुंड’ चित्रपटाचे कलाकार मंचावर येऊन स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहेत. नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटाची माहिती देण्यासाठी आणि स्पर्धकांचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी सुरांच्या मंचावर येणार आहेत. सैराट फेम आर्ची आणि परशा यांनी महाराष्ट्राच्या मनामनांत स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत यांचे चाहते बघायला मिळतात. आणि आता या चाहत्यांसाठी ही जोडी आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती हा संगम पुन्हा बघायला मिळणार आहे. ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लाडक्या कलाकारांना बघण्यासाठी पाहा, फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध.,रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.