ठाणे : शहरातील कोरोना परतीच्या मार्गावर असून आज फक्त १४ नवीन रुग्णांची भर पडली तर ५१जण कोरोनामुक्त झाले आहेत. संपूर्ण शहरात अवघे २०२ ऍक्टिव्ह रूग्ण शिल्लक राहिले आहेत तर पाच प्रभाग समिती क्षेत्रात एकही रूग्ण सापडला नाही.
नौपाडा-कोपरी, लोकमान्य-सावरकर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या पाच प्रभाग समिती परिसरात एकही नवीन रूग्ण आढळला नाही. सर्वात जास्त नऊ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. प्रत्येकी दोन रुग्णांची भर वर्तकनगर आणि उथळसर प्रभाग समिती भागात पडली आहे तर एक रूग्ण वागळे प्रभाग समिती येथे नोंदवला गेला आहे.
विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी ५१जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,०४९जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सुदैवाने एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल १,६२७ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये १४जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २३ लाख ७७,१९८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,३७८ रूग्ण बाधित मिळाले.