नवी मुंबई : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज कोकण भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोकण विभाग तसेच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केला आहे. 20 फेब्रुवारी 2022 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 210 वी जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे. शासनाने मागच्या वर्षी बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे राज्यभरातील सर्व मराठी पत्रकार संघटनांनी सन्मानाने स्वागत केले. शासनाने यावर्षी देखील शासन निर्णय काढून 20 फेब्रुवारी रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज्यात शासकीयस्तरावर विविध ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे.