कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापालिका मुख्यालयातही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे आयुक्त दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्ध पुतळ्यास देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त (कर) विनय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनिल जोशी, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, क प्रभागचे सहायक आयुक्त सुधीर मोकल, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
डोंबिवलीतही महापालिकेचे विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांनी मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी ग प्रभागाच्या सहा.आयुक्त रत्नप्रभा तायडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.