जिल्ह्यात दिवसभरात पाच हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळ सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ५,१९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २६ लाख ३९,४२० डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख २५,८७१ नागरिकांना तर ५६ लाख ८०,८९८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३२,६५१ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ९२ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.