रखडलेल्या नव्या रेल्वे स्थानकाबाबत रेल्वेमंत्र्यांकडून पालिकेला विचारणा

ठाणे : रखडलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या विकास कामांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज विचारणा करण्यात आली.

या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे उपाध्यक्ष सुजय पत्की यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, प्रवीण फापळकर, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होती.

स्मार्ट सिटी प्रकल्पात नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या कामसाठी २६२ कोटी ७६ लाख रुपये खर्च येणार आहे. या पुलाच्या कामासाठी ७ मार्च २०१९ रोजी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात येऊन, पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत देण्यात आली. मात्र, काम रखडल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामासंदर्भात आढावा घेतला. या स्थानकासाठी रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे. मात्र, भूसंपादन रखडल्यामुळे स्थानकाचे काम वेगाने सुरू झालेले नाही. राज्य सरकार व महापालिकेने तातडीने भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशी सुचना त्यांनी केली. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या नियोजित इमारतीसंदर्भातही काही सुचना रेल्वेमंत्र्यांनी केल्या. ठाणे पूर्व रेल्वे स्थानकातील रखडलेले सॅटीस प्रकल्पाच्या कामाबाबतही लक्ष देण्याची सुचना रेल्वेमंत्र्यांनी केली.