ठाण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना मनसेने नव्या जोमाने मैदानात शड्डू ठोकला आहे. आज जय भगवान हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उदंड उपस्थिती दिसली.
यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.