युवा विश्वविजेते ओस्तवाल, तांबे महाराष्ट्राच्या रणजी संघात

डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि अष्टपैलू कौशल तांबे या भारताच्या युवा विश्वचषक विजेत्या संघातील दोन खेळाडूंना महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आहे.

ग-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राची १७ फेब्रुवारीपासून हरयाणाशी पहिली लढत सुरू होणार आहे. अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील या संघात आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडची वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड झाल्याने तो रणजीच्या साखळी टप्प्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने म्हटले आहे.

महाराष्ट्राचा संघ

अंकित बावणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), यश नहार, पवन शहा, नौशाद शेख, अझीम काझी, विशांत मोरे (यष्टीरक्षक), सत्यजीत बच्छाव, अवधूत दांडेकर (यष्टीरक्षक), तरनजितसिंह ढिल्लाँ, मुकेश चौधरी, आशय पालकर, प्रदीप दधे, दिव्यांग हिंगणेकर, यश क्षीरसागर, विशाल गिते, निकित धुमाळ, सिद्धेश वीर, मनोज इंगळे, विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे.