ते आभाळ भीष्माचं होतं महाकादंबरीचे प्रकाशन

ठाणे : डॉ. श्री. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ज्येष्ठ लेखक अशोक समेळ लिखित ते आभाळ भीष्माचं होतं या महाकादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि अभिवाचन राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. अशोक बागवे (ज्येष्ठ कवी, साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील, डॉ. प्रा. प्रदीप ढवळ केंद्रिय कार्याध्यक्ष, कोमसाप, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

“ते आभाळ भीष्माचं होतं” या पुस्तकाचे अभिवाचन अशोक समेळ, संजीवनी समेळ व श्रद्धा समेळ यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते संग्राम समेळ यांनी केले.