भारतातील 30 रेल्वे स्थानके बनविणार दिव्यांगासाठी सहाय्यकारी

स्टॅडर्ड चार्टर्ड बँक अनुप्रयास आणि समर्थनम ट्रस्टचा पुढाकार 

मुंबई : अनुप्रयास आणि समर्थनम ट्रस्टच्या सहाय्याने भारतातील 30 रेल्वे स्थानकांवर अपंग व्यक्तींसाठी योग्य त्या सुविधा पुरवत ही स्थानके दिव्यांगासाठी सहाय्यकारी रेल्वेस्थानके बनविण्याची योजना स्टॅटर्ड चार्टड बँकेने आखली आहे.

बँकेच्या “सिईग इज बिलीव्हिंग” या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला असून हा उपक्रम अंधत्व आणि दृष्टीदोष दूर करण्यास मदत करतो. दृष्टीदोष असणारे, व्हीलचेअर वापरणारे आणि श्रवणास अडचणी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्रपणे आत्मसन्मानाने  प्रवास करण्यासाठी बँकेचा हा नवीन उपक्रम प्रवासासाठी इतरांवरील अवलंबित्व कमी करणार आहे.

बँकेच्या या उपक्रमात दिल्या जाणाऱ्या सुविधा फलाटांवर तसेच जिन्यांवरही ब्रेल लिपीतील फलक बसविले जाणार असून त्यामुळे त्यांना फलाट क्रमांक आणि अन्य सुविधा ओळखण्यास मदत होईल. स्त्री-पुरूष प्रसाधनगृहासारख्या सुविधा ओळखता येण्यासाठी ब्रेल लिपीतील सर्वसाधारण चिन्हे लावली जाणार आहेत. अंधुक नजर असणाऱ्या व्यक्तींसाठी जिन्यांवर परावर्तित पट्या बसविल्या जाणाऱ आहेत. स्थानकांमध्ये ब्रेल नकाशे बसविले जाणार आहेत. चौकशी विभागात ब्रेल लिपीतील माहिती पुस्तिका ठेवल्या जाणार आहेत. स्थानकाविषयीचा व्हिडीओ सांकेतिक भाषेत पाहता येण्यासाठी क्यूआर कोड राहणार. दिव्यांग डब्यात प्रवेश करण्यासाठी सरकता रॅम्प आणि व्हिलचेअरची सुविधा दिली जाणार. ठाणे स्थानकात या सुविधा सर्वप्रथम दिल्या जाणार असून एक एप्रिल 2022 पर्यंत अन्य 30 स्थानकात त्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या प्रमुख स्थानकात चेन्नई, वांद्रे, अहमदाबाद, भोपाळ, मथुरा, आग्रा, सिकंदराबाद आणि जयपूर आदींचा समावेश आहे.