ठाण्यात कोरोनाचे ८८ नवीन रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रूग्णसंख्या पुन्हा एकदा किंचित वाढली आहे. आज ८८ नवीन रुग्णांची भर पडली तर एक जण दगावला आहे. ४३०जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वाधिक ३३ रूग्ण माजिवडे-मानपाडा समिती क्षेत्रात वाढले आहेत. १३जण वर्तकनगर प्रभाग समिती येथे वाढले आहेत. प्रत्येकी दहा रुग्णांची भर लोकमान्य-सावरकर नगर आणि उथळसर प्रभाग समिती परिसरात मिळून आले आहेत. नऊ रूग्ण वागळे आणि आठ रुग्णांची नोंद नौपाडा-कोपरी प्रभाग समिती भागात झाली आहे. कळवामध्ये तीन, मुंब्रा येथे एक रूग्ण सापडला आहे तर सर्वात कमी शून्य रुग्णांची नोंद दिवा प्रभाग समिती भागात झाली आहे. एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ४३०जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ७९,८६६ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहे तर रुग्णालयात आणि घरी ९४६ जणांवर उपचार सुरू आहेत. एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१२३जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,४४५ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यात ८८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ५८,५११ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८२,९३५जण बाधित मिळाले आहेत.