ओरोस : आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी काल पूर्ण झाली असून आज याबाबतचा निर्णय दिला आहे. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. स्वीय सहायक राकेश परब यालाही जामीन मंजूर झाला आहे.
नितेश राणे यांनी आठवड्यातून एक दिवस कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. तसेच चार्ज शिट दाखल होईपर्यंत कणकवलीत न येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्यावतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे यांनी निकाल आज जाहीर केला जाईल असे काल जाहीर केले होते.
दरम्यान सोमवारी राणे यांना छातीत दुखत असल्याने दुपारी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची इको चाचणी घेण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल सामान्य आला, पण त्यांचा रक्तदाब वाढला होता. सध्याही त्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे.