ठाण्यात नवीन ७८ रुग्ण; रुग्णालयात फक्त ६९ दाखल

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा किंचित वाढला आहे. आज ७८ नवीन रुग्णांची भर पडली तर २५७जण रोगमुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकही जण दगावला नाही. रुग्णालयात फक्त ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका हद्दीतील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त ३४ तर वर्तकनगर प्रभाग समिती येथे १५ रूग्ण सापडले आहेत. प्रत्येकी सहा जण कळवा आणि वागळे प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. लोकमान्य-सावरकरनगर आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती येथे प्रत्येकी पाच रूग्ण वाढले आहेत. प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद दिवा आणि उथळसर प्रभाग समितीमध्ये झाली आहे तर सर्वात कमी शून्य रूग्ण मुंब्रा प्रभाग समिती भागात नोंदवले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २५७जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ७९,१८८जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १४७७जणांवर उपचार सुरू आहेत.आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१२२ जण दगावले आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,२१२ नागरिकांची चाचणी घेतली. त्यामध्ये ७८जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २३ लाख ५५,७६९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८२,७८७ बाधित मिळाले आहेत.