जिल्ह्यात दिवसभरात १८ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री नऊपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १८ हजार ४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २३ लाख ५८,३७७ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ९४,७६३ नागरिकांना तर ५४ लाख ५७,०१२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६,६०२ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३७४ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.