ठाणे : शहरातील कोरोना वाढ कमी होत असून ठाणे शहराची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू झाली आहे. आज १३४ नवीन रूग्ण सापडले. एक रूग्ण दगावला आहे तर तिसऱ्या लाटेत प्रथमच वागळे प्रभाग समितीमध्ये एकही रूग्ण सापडला नाही.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ७७जण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती येथे वाढले आहेत. १६जण उथळसर आणि १२ रूग्ण वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये वाढले आहेत. कळवा परिसरात नऊ तर नौपाडा कोपरी प्रभाग समिती भागात आठ रुग्णांची नोंद झाली आहे. चार रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग येथे मिळाले आहेत तर प्रत्येकी दोन जण दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती येथे नोंदवले गेले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५९ रूग्ण सापडले आहेत. १२५जण नवी मुंबई महापालिकेत २२रूग्ण, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात २२ जण, मीरा-भाईंदर येथे २२ तर सर्वात कमी तीन रूग्ण भिवंडी महापालिका हद्दीमध्ये वाढले आहेत. अंबरनाथ नगरपालिका हद्दीत आठ रूग्ण बदलापूरमध्ये १२ आणि ठाणे ग्रामीण परिसरात २३ रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात ९९९९ रुग्णांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ११,८१२जण दगावले आहेत तर सहा लाख ८२,६५१ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.