एक लाख ठाणेकरांनी घेतला बुस्टर डोस

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २८ हजार १९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २३ लाख ९,३१५ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ८८,०७९ नागरिकांना तर ५४ लाख १९,९४३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १,२९३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३९० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.