महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबईकर जेमिमा, पूनमला डावलले!

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी गतउपविजेत्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून युवा जेमिमा रॉड्रिग्ज आणि अनुभवी पूनम राऊत या मुंबईकर फलंदाजांना १५ सदस्यीय संघातून डावलण्यात आले आहे.

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यंदा ४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याऐवजी मेघना सिंह आणि रेणुका सिंह या युवा गोलंदाजांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताचा संघ

’ फलंदाज : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया.

’ यष्टिरक्षक : रिचा घोष, तानिया भाटिया

’ अष्टपैलू : दीप्ती शर्मा, स्नेह राणा

’ वेगवान गोलंदाज : झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंह

’ फिरकी गोलंदाज : राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव

’ राखीव खेळाडू : सब्भिनेनी मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर