१७ जानेवारीपासून स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’

मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर सुरू होतेय नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’.

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘पिंकी हे कुतुहल निर्माण करणारं पात्र आहे. जगण्याची उर्मी देणारं, परिस्थितीला न घाबरणारं आणि सतत विजयी कसं होता येईल याचा ध्यास असणारं. सध्याच्या परिस्थितीत असं पात्र रसिकांचं मनोरंजन करेल तसंच स्फुर्ती सुदधा देईल.’

तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका पिंकीचा विजय असो 17 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.