झी मराठी वरील “हे तर काहीच नाय!” हा स्टॅन्डअप कॉमेडीच स्वरूप असलेला कार्यक्रम आता सज्ज झाला आहे, मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्यासाठी हि. या कार्यक्रमातून कलाकार आपल्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से, धमाल आठवणी सांगून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. “हे तर काहीच नाय!”च्या पहिल्याच भागात आपण भेटणार आहोत आपल्या सर्वांचे आवडते कलाकार केदार शिंदे, वंदना गुप्ते, सुशांत शेलार, अजित कुमार कोश्ती आणि विजय कदम यांना.
आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात, काय नेमकं घडत असेल? याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना असते. पण “हे तर काहीच नाय!” या कार्यक्रमावर प्रेक्षकांना त्त्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आपले कलाकार मंडळीही मनसोक्त गप्पांची मैफिल रंगवणार आहेत.
तर चला मग आपण हि तैयार राहुयात, आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील मजेशीर, धमाकेदार किस्से ऐकण्यासाठी फक्त “हे तर काहीच नाय!” वर, शुक्रवार, १० डिसेंबर पासून दर शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.