पत्नीने केली पतीची हत्या 

भिवंडी : तालुक्यातील कांबा गावात पागीपाडा येथे वारंवार संशय घेऊन भांडण करत असल्याने पत्नीने संगनमत करून नवऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे.

संजय पागी (३८)असे मयत पतीचे नाव असून त्यांच्या घरी पत्नीने मानलेला भाऊ अक्षय हा नेहमी येत असे. त्याच्यावर संशय घेऊन संजय हा त्याची पत्नी सविता हिला नेहमी बोलत असे. त्यावरून होणाऱ्या भांडणाला कंटाळून सविता हिने काल रविवार रोजी  दुपारी सव्वा तीन वाजता संजय याचा गळा दाबून त्याची हत्या केली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी सविता व अक्षय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.