कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाले आहेत.
आजच्या या ५५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४२ हजार ३६९ झाली आहे. यामध्ये ६३६ रुग्ण उपचार घेत असून एक लाख ३८ हजार ९७८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या ५५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व चार, कल्याण पश्चिम-२६, डोंबिवली पूर्व आठ, डोंबिवली पश्चिम नऊ, मांडा टिटवाळा सहा तर मोहना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.