ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. आज सहा रूग्ण सापडले आहेत तर जिल्ह्यात १२ रुग्णांची भर पडली. दुर्दैवाने आज एकाचा मृत्यू झाला आहे.
महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात चार रूग्ण नोंदले गेले आहेत. लोकमान्य-सावरकर आणि उथळसर प्रभाग समिती परिसरात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. नवी मुंबई येथे चार रूग्ण वाढले आहेत. उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर महापालिका भागात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे इतर महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात शून्य रूग्ण नोंदवले गेले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ९०३५ रूग्ण बाधित सापडले आहेत तर सहा लाख ९७,०३१जण कोरोनामुक्त झाले आहेत. ११,८९३ रूग्ण दगावले आहेत. सध्या विविध रुग्णालय आणि घरी ९१जणांवर उपचार सुरू आहेत.