ठाणे : ठाणे शहर आणि कळव्याला जोडणा-या ठाणे-कळवा खाडीवरील नव्या-को-या पुलाची विविध कामे सध्या ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाची कामे हातावेगळी करुन, वरुणराजा न बरसल्यास डांबरीकरणाच्या कामांना प्रारंभ होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
या पुलाच्या बांधकामाचा आजवरचा एकूण खर्च १८३ कोटी ६६ लाख रुपये झाला आहे. या पुलाची सर्व कामे हातावेगळी झाल्यानंतर हा पूल वाहतुकीला खुला होईल आणि ताशी ३० किमी वेगाने सर्व वाहनांना प्रवास करता येणार आहे. तिसरा कळवा पूल जून २०२२ पर्यंत सर्व वाहनांसाठी खुला होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
हा तिसरा नवीन अत्याधुनिक पूल २.४ किमी (दीड मैल) आणि वर्तुळाकार आकाराचा पूल १८३ कोटी ६० लाखांत बांधला गेला आहे. मात्र या पुलाच्या बांधणीचा मूळ खर्च १६९ कोटी रुपये होता. हा पूल क्रीक रोडपासून सुरू होऊन साकेत मार्गावर जातो, उजवीकडे खाडीकडे वळून ठाणे-बेलापूर रोडला वळतो. हा नवीन पूल कळव्याच्या दिशेने एकेरी वाहतुकीसाठी वापरला जाईल, तर दुसरा पूल ठाण्याच्या दिशेने एकेरी मार्गात बदलला जाईल. पुलाचे बांधकाम सन २०२१ मध्ये पूर्ण झाले. मात्र, प्रवेश रस्ते आणि पादचारी मार्गांचे काम पूर्ण झाले नव्हते.
जवळपास २.४ किलोमीटर लांबीचा आणि यु आकाराचा हा पूल क्रिक रस्त्यावरून साकेतमार्गे निघून खाडी ओलांडून ठाणे-बेलापूर रस्त्यावर महापालिकेच्या रुग्णालयासमोर संपणार आहे. हा पूल पटणीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कारागृहातील व्यवहार दिसणार नाहीत
साकेत येथील ३० टक्के कामे शिल्लक असून, ती हातावेगळी करण्यासाठी ४ ते साडेचार महिन्यांचा अवधी लागणार आहे. या नव्या पुलावरुन कारागृहातील दैनंदिन व्यवहार दिसणार असल्याने पुलावर साईट आणि नॉईज बॅरिकेडस् बसवण्यात येणार आहेत.