ठाणे : पारंपारिक उर्जा तयार करताना ब-याचशा तांत्रिक बाबींची आणि लागणारा वेळ व तयार झाल्यानंतर ती ग्रीडमध्ये टाकण्याची पूर्तता आदी करावी लागत असल्यामुळे ‘महावितरण’ने सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यानंतर देयक शून्य असणार आहे. ही वीज मोफत मिळणार असून, महावितरणालाही जास्तीची वीज विक्री करुन संबंधितांना उत्पन्न मिळणार आहे. त्यात ग्राहकांचा दुहेरी फायदा होणार आहे. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफटॉप सोलर सिस्टिम बसवण्याकरता महावितरण मदत करणार आहे, अशी माहिती ठाणे आणि कल्याणच्या ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिका-याने दिली.
या मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयापर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे आणि घराच्या छतावर रूफटॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊजेर्चा वापर करून वीज निर्मिती करता येणार व ती वीज घरी वापरता येणार आहे आणि तिची गरज स्वत: पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती जर झाली तर वीज बिल हे शून्य येते, अर्थातच वीजही मोफत मिळते. त्यासोबत जी जास्तीत जास्त वीज तयार होते आहे, ती महावितरणाला विकून उत्पन्न देखील मिळवता येणार आहे.
‘रूफटॉप सोलर सिस्टिम बसवणा-या वीज ग्राहकांना दोन किलो वॅट क्षमतेच्या प्रत्येक किलोवॅटला प्रत्येक 30 हजार रुपये अनुदान मिळणार असून, अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेच्या सिस्टीमच्या ग्राहकाला एका किलोवॅटला १८ हजार रुपयांची अधिक सबसिडी मिळणार आहे.
अर्थातच एक किलोवॅटसाठी 30000, आणि दोन किलो वॅट साठी 60000, रुपये व तीन किलो वॅट करता 78000 रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळणार आहे. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफटॉप सोलर सिस्टिम बसवण्याकरता महावितरण मदत करणार आहे.शिवाय, ग्राहकांनी ‘एचटीटीपीएस:पीएमएसयूआरवायएजीएचअेआर.जीओव्ही.इन’या पोर्टलवर नोेदणी करावी, असे आवाहन ‘महावितरण’नी केले आहे.