ठाणे: भिवंडी परिसरात ६६ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली असून, आरोपीला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१७ ऑक्टोबर २४ रोजी रात्री पावणेदहा वाजता भिवंडी येथील पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक दोन यांना मिळालेल्या माहितीवरुन नाशिककडून ठाण्याकडे जाणा-या सेवा रस्त्यावर माणकोली भिवंडी येथे सापळा रचला होता. सापळ्यातील व्यक्ती उमरान खान (२५) याच्याकडे ६६ ग्रॅम वजनाची एम.डी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ, विवा कंपनीचा फोन आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख १७ हजार २५० रुपये किमतीचा ऐवज सापडला.
या घटनेबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन व्यक्तींविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार करत आहेत.