ठाणे: ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात मनुष्यबळ, जेसीबी, पालटून व पोकलेन या मशिनचा वापर करून व्यापक प्रमाणात नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून आज महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी केली.
शहरातील ६५ ते ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून उर्वरित नालेसफाईची कामे ८ ते १० दिवसात पूर्ण करण्याचे आदेश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठाणे महानगपालिकेच्यावतीने यंदा नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाचा पाहणी दौरा करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी ९ पासून महापालिका आयुक्त श्री. शर्मा यांनी हिरानंदानी येथून नाले सफाई कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यास त्या-त्या विभागातील माजी नगरसेवक आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी हिरानंदानी, ब्रह्मांड पार्क, बटाटा कंपनी, कासारवडवली नाला, कॅशलमिल नाकामी केव्हीला नाला, चंदनवाडी, वागळेप्रभाग समिती, मुलुंड चेक नाका, लोढा, यशस्वी नगर, रोड नं.१६, किसननगर तसेच आयटीआय येथील नाले साफसफाई कामाची पाहणी केली. या सर्व नाल्याची खोली वाढविणे, डेब्रिज उचलणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी संबंधितांना दिल्या.
यंदा पावसाळ्यामध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक उपाययोजना करण्यासोबत नालेसफाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिल्या.
के.विला, मीनाताई ठाकरे चौक या ठिकाणी असलेला नाला आणि वंदना डेपो जवळील नाला या नाल्यांचा समावेश आहे. हे तीनही नाले अजूनही कचऱ्याने भरलेले असून या नाल्यांची सफाई झाली कि नाही असा प्रश्न या नाल्यांकडे बघितल्यानंतर उभा राहतो. वंदना डेपो येथील नाल्याचे पाणी पावसाळ्यात थेट रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी नालेसफाई लवकर झाली नाही तर यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या तीन नाल्यांची सफाई ५० टक्के देखील झाली नसून या संदर्भात ठेकेदारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.