ठाणे : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची किंचित वाढ झाली आहे. आज १४ रुग्णांची भर पडली असून ठाणे शहरात दोन रूग्ण सापडले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आठ रुग्णांची भर पडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात चार आणि ठाणे महापालिका येथे दोन अशा १४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित महापालिका आणि नगरपालिकांमध्ये एकही रूग्ण आढळून आला नाही.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३३७ रूग्ण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ६५जणांवर उपचार सुरू आहेत. ठाणे शहरात १६ सक्रिय रूग्ण आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,०५६जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत ११९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.